Letra Dhangar Raja de Sachin Pilgaonkar

Letra de Dhangar Raja

Sachin Pilgaonkar

Dhangar Raja
Sachin Pilgaonkar
(0 votos)
धनगर राजा, वसाड गावाचा,
येळकोट गातो, मल्हारी देवाचा,
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा

वसाड गावाचा, धनगर राजा,
राणा वनातून, मेंढरं पाळी,
त्याच्या पायी तो, रानी वणीच्या, काटेरी कुटेरी बाभळी झाडी,

वसाड गावाचा, धनगर राजाचा,
काळा कुत्रा, सेना रे पती,
खायला लागती, पन्नास भाकरी,
ईळभर तो, मेंढ्या भवती,

धनगर राजा, वसाड गावाचा,
येळकोट गातो, मल्हारी देवाचा
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा

वसाड गावाच्या, धनगर राजाला, सांगून आली रे, काळी नवरी
बावरा राजा, गब्बरया मेंढीच्या लाजून गळ्यात, मिठी रे मारी

वसाड गावाच्या धनगर राजाच, काळया नवारीशी झाल लगीन,
धनगर राजा, काळी नवरी, लग्नांत जेवली अडीच पान,
वसाड गावाचा धनगर राजा, जेजुरी गावाला गोंधळ घाली,
शेकाट्या खाली, काळ्या घोंगडीचा, मांडव घाली आभाळा खाली,

धनगर राजा वसाड गावाचा,
येळकोट गातो मल्हारी देवाचा,
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा

वसाड गावाच्या धनगर राजाच्या, अंधाऱ्या मांडवी पेटले गोत,
आंधळ्या गोंधळी संबळ वाजवी, लंगड्या मुरळ्या नाचल्या सात,

वसाड गावाच्या धनगर राजाची, काळी नवरी रानांत गेली,
वाघाच्या पाठीत मारली लाथ, उंदराला भ्याली, दूर पाळली,
वसाड गावाच्या धनगर राजान, पोराच्या पायी नवस केला,
पोरं झाली बारा, पोरी झाल्या तेरा,
गब्बरया केसांचा, मेंढा मारला

धनगर राजा वसाड गावाचा,
येळकोट गातो मल्हारी देवाचा,
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा

वसाड गावच्या धनगर राजाचा, वाजतो ढोल,
फाटले धरणी, तुटल्या तारा, सूर्य देवाचा सुटला तोल,

वसाड गावचा धनगर राजा, हसतो नाचतो, घालतो पिंगा,
बक्खळ बकरी, बक्खळ मेंढ्या, रानी बाभळीला बक्कळ शेंगा,
वसाड गावचा धनगर राजा, हसतो नाचतो, घालतो पिंगा,
बक्खळ बकरी, बक्खळ मेंढ्या, रानी बाभळीला बक्कळ शेंगा,

धनगर राजा वसाड गावाचा,
येळकोट गातो मल्हारी देवाचा,
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा

धनगर राजा वसाड गावाचा,
येळकोट गातो मल्हारी देवाचा,
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा

धनगर राजा वसाड गावाचा,
येळकोट गातो मल्हारी देवाचा,
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा

Comparte Dhangar Raja! con tus amigos.

Que tal te parece Dhangar Raja de Sachin Pilgaonkar?
Pesima
Mala
Regular
Buena
Excelente